लोकशाहीच्या जिवावर बेतले होते तेव्हा
२०२४ च्या जानेवारी महिन्यात एका दुपारी आमच्याच आसपास राहणारे पांढरपेशे स्त्री-पुरुष भगवे नेसून एखाद्या टोळीसारखे अक्षता वाटत दारात येऊन उभे राहिले. त्यांनी देऊ केलेल्या अक्षता नाकारायची इच्छा असूनही मी हात पुढे केला तेव्हा, मला स्वतःचीच शरम वाटली. ते दारावर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’चे स्टिकर चिकटवून, झेंडा देऊन निघून गेले. त्या अक्षता टाकून देताना, …